Maharashtra Drought Relief 2026 महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. चालू खरीप हंगामात पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे राज्यभरात पिके करपली आहेत, पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ग गंभीर बनला आहे. या बिकट परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आणि प्रत्यक्ष नुकसान समजून घेण्यासाठी केंद्र सरकारचे आंतरमंत्रालयीन पथक सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. राज्य सरकारने केंद्राकडे १७,५00 कोटी रुपयांच्या अंतरिम आर्थिक मदतीची मागणी केली असून, या केंद्रीय पथकाच्या अहवालानंतर मदतीबाबत पुढील निर्णय होण्याची शक्यता आहे.
१७,५00 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी नेमकी कशासाठी करण्यात आली आहे Maharashtra Drought Relief 2026
राज्य सरकारने केंद्र सरकारला सादर केलेल्या प्रस्तावानुसार, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोठ्या निधीची मागणी करण्यात आली आहे. या प्रस्तावामध्ये प्रामुख्याने दोन महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे. यामध्ये खरीप पिकांच्या झालेल्या मोठ्या नुकसानासाठी १३,००० कोटी रुपयांची मदत मागितली आहे. तसेच जनावरांसाठी चाऱ्याचे योग्य व्यवस्थापन आणि चारा छावण्यांच्या नियोजनासाठी ४,५०० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. ही केवळ राज्याची मागणी असून, अंतिम मदत किती मंजूर होते आणि त्याचे वाटप कसे होते, हे केंद्र सरकारच्या अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होईल.
केंद्रीय पथकाकडून शेतांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी
केंद्र सरकारच्या ११ सदस्यीय आंतरमंत्रालयीन पथकाचा महाराष्ट्र दौरा ८ ते ११ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सुरू आहे. या पथकाला तीन वेगवेगळ्या गटांत विभागून राज्यातील विविध दुष्काळग्रस्त भागांत पाठवण्यात आले आहे. हे पथक प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी करत आहे. पावसातील खंडामुळे शेतीवर झालेला परिणाम, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, जनावरांचा चारा आणि दुष्काळामुळे बळीराजावर आलेला आर्थिक ताण या सर्व बाबींचा सविस्तर आढावा घेतला जात आहे. या पाहणी अहवालाच्या आधारावरच केंद्राकडून मदतीचा निधी ठरवला जाणार आहे.
कोणत्या जिल्ह्यांमध्ये सुरू आहे केंद्रीय पथकाची पाहणी दौरा
केंद्रीय पथकाच्या या महत्त्वाच्या दौऱ्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अतिशय गंभीर दुष्काळग्रस्त भागांचा समावेश करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने अहिल्यानगर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांत पाहणी केली जात आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड परिसरातील पिकांची स्थिती तपासली जात आहे. तसेच विदर्भातील नागपूर, यवतमाळ आणि लगतच्या टंचाईग्रस्त भागांचाही यात समावेश आहे. मात्र, एखाद्या भागात पथक येऊन गेले म्हणजे तेथील प्रत्येक शेतकऱ्याला आपोआप मदत मंजूर झाली, असा समज करून चालणार नाही.
शेतकऱ्यांनी मदतीबाबत कोणती काळजी घेणे आणि काय तपासावे
शेतकऱ्यांच्या मनात मदतीची रक्कम खात्यात कधी जमा होणार याबाबत उत्सुकता आहे. परंतु, अंतिम मंजुरी आणि निकष जाहीर होईपर्यंत काही गोष्टींची पूर्तता करणे गरजेचे आहे. आपल्या शेतातील पिकांच्या नुकसानीचे शासनाच्या नियमांनुसार पंचनामे झाले आहेत का, याची खात्री करावी. स्थानिक तलाठी, कृषी सहाय्यक किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या नोंदी तपासून घ्याव्यात. तसेच आपले बँक खाते आधार कार्डशी संलग्न असल्याचे सुनिश्चित करावे. सोशल मीडियावर पैशांच्या वाटपाबाबत किंवा यादी जाहीर झाल्याबाबत पसरणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता केवळ शासकीय अधिकृत माहितीवरच लक्ष ठेवावे.Maharashtra Drought Relief 2026
आई योजना: महिलांना पर्यटन व्यवसायासाठी ₹१५ लाखांपर्यंत कर्ज आणि १२% व्याज परतावा!