दिवाळीपूर्वी रेशन कार्डधारकांसाठी मोठा निर्णय! १९ जिल्ह्यांतील लाभार्थ्यांना ‘गव्हाऐवजी ज्वारी’ मिळणार; ‘आनंदाचा शिधा’ रद्द Ration Cardholders

राज्यातील शिधापत्रिकाधारक (Ration Cardholders) लाभार्थ्यांसाठी अन्न नागरी पुरवठा विभागाने ऑक्टोबर महिन्यात रेशन वाटपाबाबत महत्त्वाचे बदल केले आहेत. या निर्णयानुसार, या वर्षीच्या दिवाळीत शासनाकडून दिला जाणारा “आनंदाचा शिधा” रद्द करण्यात आला आहे.

त्याचबरोबर, राज्यातील १९ जिल्ह्यांमधून शिधापत्रिकाधारकांना गव्हाचे प्रमाण कमी करून त्याऐवजी ज्वारी (Jowar) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय मागील हंगामातील ज्वारीच्या जादा खरेदीमुळे अतिरिक्त साठा सार्वजनिक वितरण व्यवस्थेत (PDS) वापरण्यासाठी घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

योजनेच्या धान्याच्या प्रमाणात बदल

पुरवठा विभागाने १९ जिल्ह्यांमध्ये गहू आणि ज्वारी समान प्रमाणात वाटप करण्याचे आदेश दिले आहेत.

लाभार्थी योजनाजुने प्रमाण (गहू/तांदूळ)ऑक्टोबर-नोव्हेंबरमधील नवीन प्रमाण (गहू/ज्वारी/तांदूळ)
अंत्योदय योजना (कुटुंब)१५ किलो गहू आणि २० किलो तांदूळ७.५ किलो गहू, ७.५ किलो ज्वारी आणि २० किलो तांदूळ
प्राधान्य कुटुंब (प्रति व्यक्ती)२ किलो गहू आणि ३ किलो तांदूळ१ किलो गहू, १ किलो ज्वारी आणि ३ किलो तांदूळ

ज्या १९ जिल्ह्यांना ज्वारी मिळणार, त्यांची यादी

राज्यातील एकूण १९ जिल्ह्यांचा समावेश या निर्णयामध्ये करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये गव्हाचे प्रमाण कमी करून ज्वारी दिली जाईल.

  1. हिंगोली
  2. बुलढाणा
  3. अकोला
  4. जळगाव
  5. नांदेड
  6. परभणी
  7. बीड
  8. धाराशिव (उस्मानाबाद)
  9. अहिल्यानगर (अहमदनगर)
  10. लातूर
  11. सोलापूर
  12. पुणे
  13. सातारा
  14. सांगली
  15. वर्धा
  16. नागपूर
  17. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)
  18. नाशिक
  19. नंदुरबार

जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब पाटील यांनी माहिती दिली की, ज्वारीच्या अतिरिक्त साठ्याचा उपयोग सार्वजनिक वितरण व्यवस्थेत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात हे वाटप होणार असून काही जिल्ह्यांत ते डिसेंबरपर्यंत सुरू राहील.

Leave a Comment